क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडनात एका युवकाचा गळा चिरून खून केल्याची घटना देवळी येथील यवतमाळ रोडवरील आय
टी. आय विद्यालय परिसरात शनिवार 15 रोजी रात्री 10.30 ला घडली. घटनेतील दोन आरोपिंना देवळी पोलिसांनी दोन तासात अटक केली. पोलीस पत्रकानुसार मृतक दुर्गेश राधेश्याम शेंडे (22) रा.
केदार लेआउट हा आय. टी. आय. विद्यालय परिसरात रात्री मित्रांसह बसलेला असतांना वैभव रामभाऊ दुरगुडे (26) रा.मिरणनाथ मंदिर व शुभम नारायण मातकर (25) रा. कामडी चौक यांनी मृतक दुर्गेश वर जुन्या वादातून चाकूने व हल्ला करीत जिवानिशी ठार केले.घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी आरोपिंचा शोध घेत दोन आरोपिंना अटक केली.
0 Comments