बोर्गी खुर्द (ता.जत) येथील बोर नदी पावसाच्या पाण्याने तुडूंब भरुन वाहत आहे. पाण्याचा ओघ (गती) जास्त असताना चालकाने पूलावरुन पिकअप चालवली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्व भागातील बोर्गी खुर्द येथील पिकअप मालक आणाप्पा तरनळ्ळी व त्याचा मित्र रियाज मुरशद हे दोघेजण पिकअपने करजगी येथील साहेबलाल देवाच्या उरुस यात्रेला निघाले होते. गावालगतच्या बोर नदीला गेली आठ दिवसापासून परतीचा पाऊस पडत असल्याने पाणी पुलावरुन वाहत आहे. या पूलाची उंची कमी आहे.
0 Comments