स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिकेतील खलनायिका म्हणून लोकप्रिय असलेली संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले.
मालिका दिवसेंदिवस जास्तच लोकप्रिय होत आहे. मालिकेसोबत मालिकेमधील कलाकारही प्रेक्षकांच्या मनात आपलं घर करत आहेत. संजना म्हणजेच रुपाली भोसलेनं आपल्या दमदार अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे ती सतत प्रकाश झोतात असते.
अशातच रुपालीनं सोशल मीडियावर एक भक्तीमय व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. संजना म्हणजेच रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एका लहान बाळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली एका लहान बाळासोबत खेळताना दिसत आहे.
या बाळाचं नाव अथांग असं असून तो लहानगा तिच्यासोबत मस्त गप्पा मारत आहे. संजनासुद्धा त्या बाळासोबत दिलखुलासपणे खेळात आहे. पण हा व्हिडीओ पाहून हे बाळ नक्की कोणाचं आहे. मालिकेत येणाऱ्या भागात हे संजनाचं बाळ असणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
0 Comments