करवा चौथ निमित्त गर्लफ्रेंडबरोबर खरेदी करत असतानाच भेटली पत्नी अन्...


खाद्या बॉलिवूड चित्रपटातील दृश्य वाटावं असा प्रसंग दिल्लीमधील गाजियाबाद मार्केटमध्ये पहायला मिळाला. पती आपल्या प्रेयसीसह 'करवा चौथ'ची खरेदी करत असताना रंगेहाथ पकडलेल्या पत्नीने दोघांचाही चांगलाच समाचार घेतला.

पत्नीने पतीसह त्याच्या प्रेयसीलाही बेदम मारहाण केली. घरातील कलह बाजारात सुरु असल्याने बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्नी आपल्या काही मैत्रिणींसह पती आणि त्याच्या प्रेयसीला बेदम मारहाण करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

यावेळी तिथे उपस्थित दुकानदार आपल्या दुकानाच्या बाहेर जाऊन हा सगळा गोंधळ घाला असं सांगत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे. पत्नीने याप्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार दिली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments