तरुणाचा सुड घेण्यासाठी बहिणीचे अपहरण , नंतर केले भयंकर कृत्य

 


दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या नरेला परिसरात शुक्रवारी रात्री 8 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साधारण 10 च्या आसपास एक पीसीआर कॉल आला. ज्यामध्ये सांगितले की आठ वर्षाची एक मुलगी बेपत्ता झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तत्काळ मुलीचा शोध सुरू केला.

पोलिसांनी सांगितले की, मुलीचा शोध घेत असताना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासण्यात आले. ज्यातील एका फुटेजमध्ये मुलगी एका व्यक्तीसोबत दिसली. सीसीटिव्हीतील फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. आरोपीने सांगितले, मुलीच्या भावासोबत त्याचे भांडण झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी आधी मुलीचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या केल्याचे कबुल केले.

आरोपीच्या जबाबावरुन अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात लैंगिक शोषण वगैरे झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र बलात्कार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बाकीची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येणार असल्याचे सांगितले.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. शनिवारी सकाळी नरेला पोलीस ठाण्यासमोर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. बोलले जातेय की, मुलीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या करण्य़ात आली आहे. मुलीला वडिल नसल्याने ती आई आणि भावासोबत राहत होती. मुलीची आई एका कारखान्यात मजूरीचे काम करते.

Post a Comment

0 Comments