पोलीस स्टेशन म्हटलं की तिथे चोरी, दरोडा, हत्या, मारहाण अशा अनेक तक्रारींसाठी लोक जात असतात. पण मध्य प्रदेश पोलिसांकडे चक्क एक तीन वर्षाचा चिमुरडा तक्रार करण्यासाठी आला होता. बरं ही तक्रार इतर कोणी नाही, तर तो आपल्याच आईविरोधात करण्यासाठी आला होता.
आपल्या आईवर चिडलेल्या मुलाने वडिलांना आपल्याला पोलीस ठाण्यात घेऊन जायला सांगितलं. आपली आईने कँडी चोरल्याने आणि कानाखाली मारल्याने त्याला आईविरोधात तक्रार करायची होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
0 Comments