एका लहान मुलाच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चीनमधील हा व्हिडिओ असून यामध्ये एका पाच ते सहा वर्षाच्या मुलाची 'कुंग फू'ची ट्रेनिंग सुरू आहे. त्याच्या खांद्यावर एक लाकडाचा ओंडका असून तो दोन्ही पाय लांबवून उभा आहे.
दरम्यान, कुंग फूचे प्रशिक्षण सुरू असून हा लहान मुलगा रडत आहे. त्याच्या खांद्यावर एक लाकडाचा ओंडका आहे. त्याचबरोबर तो तीन फूट उंचीच्या दोन लाकडांवर पाय लांबवून उभा आहे. त्याच्या खांद्यावर जवळपास १० ते १५ किलोंचा लाकडाचा ओंडका असून तो रडत आहे. त्यानंतर तो लाकडाचा ओंडका खाली पाडून उडी मारतो तरीही त्याला सूचना मिळत आहेत. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
0 Comments