पत्नीची मान पिरगाळून तसेच तिला बेदम मारहाण करत ठार मारले. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी दि. 27) सकाळी भोई आळी, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला. देवराम भदरु पतलावत (वय 40, रा.
भोई आळी, तळेगाव दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी देवराम याच्या सासूने (वय 50) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची मुलगी काम करत नाही म्हणून आरोपी जावई देवराम याने त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिची मान पिरगाळून (मुंडी मोडून) तिला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता तिला घरात सोडून देवराम बाहेर निघून गेला. यामुळे फिर्यादी यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी देवराम याला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments