चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकदा चोर गर्दीच्या ठिकाणीही अगदी सहज मौल्यवान वस्तू हिसकावून नेताना दिसतात
नवी मुंबईतून एका अशाच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नवी मुंबईच्या बेलापूर येथील एका सोसायटीच्या गेटमध्ये असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका चोरट्याने ओढून नेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत दुचाकीस्वार या महिलेचा पाठलाग करत आले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला एका लहान मुलाला घेऊन चाललेली आहे. ती रस्त्यावरुन सोसायटीच्या गेटमध्ये येते. इतक्यात एक व्यक्ती अगदी जोरात धावत महिलेजवळ येतो. महिलेला काही कळण्याच्या आत तो तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून तिथून पळून जातो.
0 Comments