जागेच्या वादावरून पुतण्याने केला चुलत्यावर गोळीबार


येशू लुटेरा मारवाडी (वय 28, रा. नेरे दत्तवाडी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास राजपूत (रा. माण), कार्तिक ठाकूर (आकुर्डी), पृथ्वीराज राठोड (रा. चाकण), ज्ञानेश्वर राजपूत (रा. वाडेबोल्हाई, पुणे) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत पुतण्या विकास  याने जागेच्या वादातून फिर्यादींच्या घरी जाऊन फिर्यादींना, त्यांचे चुलते, चुलत भाऊ, वडिलांना शिवीगाळ केली. फिर्यादी आरोपीला समजावत असताना विकास याने फिर्यादींवर गोळीबार केला. त्यात फिर्यादी जखमी झाले. अन्य आरोपींनी फिर्यादींच्या अन्य नातेवाईकांवर गिलोरीने दगडे मारली. विकास याने पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये गोळी झाडली. तुला माहिती आहे का, माझ्यावर किती गुन्हे आहेत. पुन्हा सोडणार नाही, अशी आरोपीने धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments