अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत.
दोघंही 2023 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच चर्चांवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. रकुल आणि जॅकी मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि एकमेकांवर असलेल्या प्रेमाबद्दल उघडपणाने बोलत असतात. E Times च्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की रकुल आणि जॅकीने त्यांच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा म्हणजेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
"लग्न 2023 मध्ये होईल आणि ही बातमी खरी आहे. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचा लग्नावर विश्वास आहे, त्यामुळे ते लग्न करणार आहेत," अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं E Timesने दिली आहे. त्याच रिपोर्टमध्ये, रकुलच्या भावाने दोघांच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला असून, रकुल आणि जॅकी दोघेही सध्या आपापल्या कामात व्यग्र असल्याचं म्हटलंय
0 Comments