प्रो-कबड्डी लीगमुळे कबड्डी घराघरांत पोहचली. एक काळ असा होता की कबड्डी हा खेळ फक्त गल्लीबोळात दिसायचा, पण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांना ते कळू लागलं आहे. प्रो-कबड्डी लीगबद्दल तुम्ही ऐकलं असेलच.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला साडी नेसून कबड्डी कशी खेळत आहेत आणि त्यांना कबड्डी खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप गर्दी करतायत.
लोक त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि स्त्रियाही एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत असल्याप्रमाणे खेळण्यात व्यस्त आहेत. महिलांची ही कबड्डी छत्तीसगडिया ऑलिम्पिकचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
0 Comments