पृथ्वीवर असलेल्या अनेकविध प्राण्यांचे काही स्वभावधर्म असतात. काही प्राणी हे सहज माणसाळतात तर काही प्राणी मात्र आक्रमक असतात. कुत्रा, मांजर, घोडे, हत्ती, उंट यासारखे प्राणी माणसांसोबत सहजीवनात राहू शकतात, तर वाघ, बिबटे, सिंह वगैरे प्राणी हे जंगलातच रमतात आणि मानवासोबत त्यांचा संपर्क आला तर संघर्षच होत असतो.
सरपटणाऱ्या प्राण्यांची माणसांना विशेषत्वानं भिती वाटत असते. या प्राण्यांसोबत लढा देण्यासाठी आवश्यक असणारं शारीरिक कसब माणसांकडे नसतं. त्यामुळे अशा प्राण्यांपासून शक्यतो दूरच राहण्याचा प्रयत्न माणसं करत असतात. किंग कोब्रा किंवा इतर विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विचारानेही अनेकांना धडकी भरत असते. अजगर हा देखील त्यापैकीच एक प्रकार. अजगराच्या हल्ल्याच्या भितीने अनेकजण पाण्यापासूनही दूर राहणंच पसंत करतात. तर अशा या अजगराला अलगद आपल्या जाळ्यात फसवल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
0 Comments