जीममध्ये घुसला भलामोठा साप , व्यायाम करणारे पैलवान म्हणाले बापरे बाप

 


अंबरनाथमध्ये  व्यायामशाळेत भलामोठा साप आढळून आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

सकाळी व्यायाम करणाऱ्यासाठी आलेले तरुण सापाला पाहून धास्तावले होते. अखेर सर्पमित्राला बोलावून या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. मात्र या सापाला पकडेपर्यंत जीममध्ये असलेल्या खेळाडूंना व्यायामाआधीच घाम फुटला होता.

अंबरनाथच्या शिवगंगा परिसरात अंबरनाथ नगरपालिकेची व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळेत आज सकाळच्या सुमारास खेळाडू व्यायाम करत होता. त्यावेळी त्यांना काहीतर सरपणारा प्राणी दिसला. खेळाडूंना प्रसंगावधान राखत थोडं निरखून पाहिलं तर तो भरामोठा साप असल्याचं दिसून आलं.

Post a Comment

0 Comments