वलांडी (जि. लातूर) : शेतातून घराकडे निघालेल्या सख्ख्या बहिणींचा देवणी तालुक्यातील अनंतवाडी साठवण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, देवणी तालुक्यातील धनेगाव तांडा येथील दोन मुली शुक्रवारी शेताकडे गेल्या होत्या. दरम्यान, सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा शाेध घेण्यास सुरुवात केली. त्यांचा मृतदेह अलंतवाडी साठवण तलावातील पाण्यावर तरंगताना आढळून आला.
कल्पना लक्ष्मण पवार आणि शिल्पा लक्ष्मण पवार या दोघीही सख्या बहिणी असून, त्या धनेगाव येथील श्री महादेव विद्यालयात अनुक्रमे नववी आणि सहावीत शिक्षण घेत हाेत्या. या घटनेने देवणी तालुक्यातील धनेगावसह तांड्यावर शोककळा पसरली आहे.
0 Comments