१२ प्रवाशांची मृत्यूला हुलकावणी, थरारक बस अपघातातून थोडक्यात कसे बचावले प्रवासी

 



नाशिकमध्ये झालेल्या खासगी बस दुर्घटनेनंतर खासगी बस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

यानंतर राज्यातील खासगी बसच्या  अपघातांची मालिकाही पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात आणखी एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचं बातमी समोर आलीय. या अपघातामुळे बसमधील सर्वच प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. एकूण 12 जण या अपघातात जखमी झालेत.

वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात MH 38 F 6899 क्रमांकाची खासगी बस अपघातग्रस्त झाली. नागपूरवरुन परभणीला ही बस जात होती. भरधाव वेगामुळे ही खासगी बस वाटेतच उलटली.

या अपघातात बसमधील एकूण 12 प्रवासी जखमी झाले. त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती. वाटेतच बस उलटली असल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.

Post a Comment

0 Comments