माझ निधन झालं आहे, अर्ध्या दिवसाची सुट्टी द्या..... विद्यार्थ्याचा अर्ज

 


शाळेला दांडी मारण्यासाठी विद्यार्थी अनेक कारणं देतात. कधी आजारी असल्याचं तर कधी नातेवाईंकच्या निधनाचं. पण एका विद्यार्थ्याने दिलेलं कारण तुम्ही कधीही ऐकलं नसेल.

अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळावी यासाठी एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना अर्ज केला. हा अर्ज वाचून मुख्याध्यापकही हैराण झाले. सुट्टीसाठी विद्यार्थ्याने केलेला अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

आठवीतल्या एका विद्यार्थ्याने सुट्टीसाठी दिलेला हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्याने आपल्याला शाळेतून अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी असल्याचं अर्जात म्हटलं आहे. यासाठी त्याने दिलेलं कारण मात्र फारच विचित्र आहे. या अर्जात त्यानं स्वत:चंच निधन झाल्याचं लिहिलं असून अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याची विनंती केली. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनीही विद्यार्थ्याची विनंती मान्य करत सुट्टी मंजूर करत असल्याचा शेरा त्या अर्जावर लिहिला

Post a Comment

0 Comments