मंदसौरमध्ये दिवाळीत एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सणासुदीच्या काळात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फटाके फोडणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं. स्टिलच्या टिफिनमध्ये लावलेला बॉम्ब एका तरुणीसाठी जीवघेणा ठरला.
टिफिनचा तुकडा तिचा पोटात घुसला. त्यामुळे तरुणीला जीव गमवावा लागला आहे.
मंदसौरच्या भावगढतील कारजू गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कारजू गावात राहत असलेल्या गोवर्धनलाल माली यांच्या घरात गोवर्धन पूजा होती. गोवर्धनलाल शेतकरी आहेत. पुजेनंतर त्यांची मुलगी टीना लहान भावासह फटाके फोडत होती. भाऊ स्टिलच्या टिफिनमध्ये सुतळी बॉम्ब ठेऊन फोडू लागला. टीना त्याचा व्हिडीओ शूट करत होती. बॉम्ब फुटताच स्टिलच्या डब्याचा टोकेदार तुकडा तिच्या पोटात घुसला.
0 Comments