पुणे: राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मावस भावाचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघातात मृत्यू झाला आहे. अंबादास हरिश्चंद्र नरवडे असे मृत्युमुखी पडलेल्या मावस भावाचे नाव असून, त्यांच्यासोबत असलेले चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मंत्री संदिपान भुमरे यांचे मावस बंधू अंबादास हरिश्चंद्र नरवडे हे औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोडचे रहिवाशी आहेत. ते आपल्या काही सहकाऱ्यांसह इनोव्हा गाडीतून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होते. पहाटे 4 वाजता कामशेतजवळ इनोव्हा गाडी टेम्पोला मागून येऊन धडकली. त्यामुळे इनोव्हा डिव्हाडरवर आदळली. त्याचवेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने आणि ट्रकने एकामागोमाग धडक दिली. अचानक झालेल्या या विचित्र अपघतामुळे नरवणे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
अंबादास नरवडे यांच्यासोबत त्यांचे मित्र आणि गाडी चालक होता. हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तळेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पैठण तालुक्यावर दु:खाचं सावट पसरले आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. टेम्पोने धडक दिल्यानंतर इनोव्हा गाडीचा स्पीड ब्रेकरवर आदळल्याचा आवाज आला. त्यानंतर ट्रकने धडक दिल्याचाही मोठा आवाज आल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.
0 Comments