गोधडी शिवण्यावरून सासू - सूनेत झाला वाद फ्री स्टाईल हाणामारी

 


सासू-सुनेत कोणत्या कारणावरून वादावादी होतील, याचा काही नेम नाही. अशीच एक घटना लोणी काळभोर  परिसरातील नायगाव पेठमध्ये घडली आहे.

सासूच्या साडीच्या गोधड्या शिवल्या रागातून दोघींमध्ये वादावादी झाली. त्यानंतर सासूने इतरांना बोलावून घेत सुनेला बेदम मारहाण  केली आहे. ही घटना 19 ऑक्टोबरला घडली आहे.

प्रियंका असे जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी सासू सिंधू जगताप, शांता साबळे, दीर अक्षय साबळे, मामे सासरा संभाजी वायकर, मामेदीर विशाल वायकर, करिश्मा चौधरी, चुलतदीर शिवलाल जगताप, चुलत सासरा शशिकांत जगताप यांच्याविरूद्ध लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रियंका नायगावमध्ये राहण्यास असून 19 ऑक्टोबरला त्यांची सासु सिंधू यांच्यासोबत वादावादी झाली होती.
साडीच्या गोधड्या शिवल्याच्या रागातून त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे सासून इतर नातेवाईकांना बोलावून प्रियंकाला बेदम मारहाण केली.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे  तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments