गुप्तधन ,महिलेच्या घरातून साहित्य जप्त

 

गुप्तधनाच्या लालसेपोटी आरती सामंत या महिलेचा पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे खून करण्यात आल्याचा प्रकार 30 सप्टेंबरला उघडकीस आला होता.

याप्रकरणी नामदेव पवार या मांत्रिकाला अटक झाली आहे.

दरम्यान, या महिलेची 4 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तपासात पोलिसांनी महिलेच्या उत्तरेश्वर पेठेतील घरातून जादूटोण्यासाठी आणण्यात आलेले साहित्य जप्त केले.
जप्त केलेल्या साहित्यामध्ये हिरव्या कापडात बांधलेला लिंबू, पेटीत ठेवलेली शंभर रुपयांची नोट, एक कॉईन, हळद, कुंकू लावलेला लिंबू, 3 लहान लाकडी पेट्या, संस्कृत लिपीतील एक ग्रंथ, लवंगा, तांदूळ, झाडाच्या वाळलेल्या मुळ्या, स्टीलच्या डब्यात ठेवलेला भात, सुपारी, भिंतीवर लटकवलेला लिंबू याचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments