मोबाईल शॉपिचे दुकान फोडले लाखोंचा ऐवज लंपास


 रभणी : शहरातील नारायण चाळ भागातील एक मोबाईल शॉपीचे दुकान फोडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत दुकानातील मोबाईलच्या विक्रीसाठी ठेवलेला सर्व माल चोरट्यांनी लंपास केला आहे.

घटनेनंतर नानलपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

शहरातील वर्दळीच्या व मुख्य बाजारपेठेत स्टेशन रोडजवळ असलेल्या नारायण चाळ परिसरात ही घटना घडली आहे. हे मोबाईल शॉपीचे दुकान चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडले. दुकानाचे शटर वापरून आज प्रवेश करीत मोबाईल आणि अन्य साहित्य असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. सकाळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सध्या पोलिसांची पाहणी आणि पंचनामा सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत पूर्ण होईल. दरम्यान, दिवाळीच्या कालावधीत ही चोरीची घटना बाजारपेठेत घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments