दुकानासमोरील पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने दोन लाख 75 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.18) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळील भगवती ग्रेनई या दुकानासमोर असलेल्या पार्किंगमध्ये सायंकाळी त्यांची चारचाकी कार (एम.एच.16 सी.सी. 7574) पार्क केली होती. त्यानंतर घरी जाण्यासाठी परत आले असता कारच्या मागची काच फोडून 2 लाख 75 हजार रूपये असलेली बॅग त्यांना आढळून आली नाही. रक्कम चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
0 Comments