जालना जिल्ह्यात किराणा दुकानदारास एकाने पैशाची मागणी केली. दुकानदाराने पैसे न दिल्याने संबंधिताने दुकानदारावर गोळीबार केल्याची घटना घडल्याचे समाेर आले आहे. या गोळीबारात दुकानदार गंभीर जखमी झाला आहे.
त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
जालन्यातील कुंभार पिंपळगाव येथे ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी एका किराणा दुकानदारावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल आहे.
0 Comments