शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून युवकाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.अविनाश सुरेश शर्मा (वय १९, रा.
मानकर याचा लहान भाऊ आणि आरोपींमध्ये शाळेत क्रिकेट खेळताना वाद झाला होता. वारजे भागातील गणपती माथा परिसरात आरोपींनी मानकर यांच्या लहान भावाला बेदम मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले.दहशत माजवून आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती वारजे पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपी शर्मा, वारकरी, गौड यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे तपास करत आहेत.
0 Comments