भर बाजारात तरुणी बनवत होती रिल्स तेवढ्यात झिंगलेला दारुडा आला आणि... व्हायरल व्हिडिओ

 



रील्स बनवणे हे हल्ली एक फॅड झाले आहे. अगदी घरात असलो किंवा कुठेही बाहेर गेलो तरी कोणत्याही गाण्यावर किंवा म्युझिकवर रील्स बनवून ते इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले जातात.

गेल्या काही वर्षात तरुणींना या रील्सने बरेच वेड लावले असून कोणत्याही ठिकाणी रील्स करण्यात त्या मग्न होतात. काहीवेळा हा प्रयोग अतिशय छान होतो पण काही वेळा तो पूर्णपणे फसतो. याचेच एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. एक तरुणी भर मार्केटमध्ये रील्स बनवत असताना अचानक एक दारुडा येऊन तिच्यासोबत नाचायला लागला आणि पुढे काय झाले पाहून आपल्याला हसू आवरणार नाही

आजुबाजूला भाज्यांचे, फळांचे स्टॉल असलेल्या मार्केटमध्येच तरुणीने डान्स सुरु केला. दिलबर- दिलबर या प्रसिद्ध गाण्यावर ती डान्स करत होती. त्याचवेळी तिच्या मागे आलेल्या खाकी कपड्यातील व्यक्तीनेही तिच्यासारख्याच स्टेप्स करायला सुरुवात केली. हा व्यक्ती दारुमुळे झिंगलेला असल्याचे आपल्याला त्याच्या स्टेप्सवरुन सहज लक्षात येते. पण आपल्या रीलमध्ये कोणी व्यक्ती येऊन नाचत आहे म्हणून कॅमेरा हँडल करणाऱ्या व्यक्तीने शूटींग थांबवले नाही, तर ते तसेच सुरू ठेवले. मग हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.


Post a Comment

0 Comments