केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात नुकत्याच दोन महिलांचा बळी दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आता आरोपीकडील जमिनीचे उत्खनन करून अन्य महिलांचाही अशाच प्रकारे खूण केला नाही ना, याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की मुख्य आरोपी मोहम्मद शफी उर्फ रशीद याने संपूर्ण केरळमध्ये फिरून आपले बळी घेतले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपींच्या जमिनीचे उत्खनन करण्यात येणार आहे, जेणेकरून तेथे आणखी मृतदेह पुरले असल्यास ते काढता येतील. या कामात प्रशिक्षित स्निफर डॉगचीही मदत घेतली जाणार आहे. पोलिसांनी शुक्रवारी शफीच्या घर आणि हॉटेलवर छापे टाकले होते. दरम्यान, केरळ पोलिसांनी एर्नाकुलम आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यातील हरवलेल्या महिलांची सर्व प्रकरणे पुन्हा उघडण्याचा आणि त्यांचा तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत पठानमथिट्टा येथे १२ तर एर्नाकुलममधून १४ महिला बेपत्ता झाल्या आहेत. नरबळी प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर या सर्वांचा तपास या कोनातून केला जाईल. त्यांची चौकशी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. चौकशीत शफीची पत्नी नबिसा हिने सांगितले की, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिने त्याला ४० हजार रुपये आणले होते. पत्नीने कुठून आणू असे विचारले असता जुने वाहन विकून पैसे आणल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान शफीने पद्मा नावाच्या महिलेची हत्या केल्यानंतर तिचे दागिने गहाण ठेवून हे पैसे आणल्याचे पोलिसांना सांगितले. एर्नाकुलम येथून दागिने गहाण ठेवणाऱ्या पिंपला पोलिसांनी अटक करून सोने जप्त केले
0 Comments