शिरढोण : कवठेमहांकाळ येथील आंबेडकरनगर परिसरात रस्त्यावरुन ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस काढण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून शाळकरी मुलगा जागीच ठार झाला.
स्वप्नील रणजित वाघमारे (वय ७) असे मृताचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी घडली.
उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्टर कवठेमहांकाळकडून हिंगणगावमार्गे कर्नाटकात जात होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहरातील आंबेडकरनगरमधून पुढे जात असताना स्वप्निल वाघमारे हा शाळकरी मुलगा ऊस काढण्यासाठी दोन ट्रॉलीच्या मधील लोखंडी हुकावर चढला.
ऊस बाहेर खेचत असताना गतिरोधकावर ट्रॅक्टर जोरात आदळल्याने तो खाली पडला. ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून तो जागीच ठार झाला. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments