रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा येथे गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी jwl बाळगणाऱ्या तरुणावर शहर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्याकडे सुमारे 17,750 किंमतीचा 71 छोट्या-छोट्या पिशव्यांमध्ये भरलेला गांजा हा अमली पदार्थ सापडला आहे.
कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचं नाव अजय अंबरनाथ कारेकर (22, रा. पडवेकर कॉलनी उद्योग नगर, रत्नागिरी ) असे असून त्याच्या विरोधात पोलीस नाईक वैभव नार्वेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी वैभव नार्वेकर सहकाऱ्यांसह पेट्रोलियमसाठी रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात फिरत असताना मिरकरवाडा येथील पांढरा समुद्राजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास एक युवक संशयास्पद स्थितीत बसल्याचं दिसून आलं. त्याच्याकडे चौकशी केली असता आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 71 छोट्या-छोट्या पिशव्यांमध्ये भरलेला गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला. या पदार्थासह तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे सापडलेला गांजा 17 हजार 750 किमतीचाजा 374 मिलीग्राम वजनाचा होता. याप्रकरणी युवकावर एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (k), 20 (ब )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments