किराणा दुकानात कामगारानेच मारला डल्ला

 


विटा येथील ऑनलाईन किराणा दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात विटा पोलिसांना अखेर यश आले. दुकानातील कामगारानेच मित्राच्या मदतीने डल्ला मारल्याचे उघड झाले.

त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमालासह ८ लाख २० हजार रुपये हस्तगत केले आहेत. रविवारी (दि.९) ही चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी मनिष देवदास झेंडे (वय२१, रा. बलवडी (खा), ता. खानापुर, सध्या रा. नेवरी, ता. कडेगाव, जि. सांगली) व पवन मधुकर होंडे (वय २१, रा. बलवडी (खा), ता. खानापूर जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments