प्रेयसीला भेटायला गेला अन् गॅलरीत उडी मारली पण ती उडी शेवटची ठरली

 

नाशिकमध्ये एका तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर एका प्रेमप्रकरणाची घटना समोर आली आहे. प्रियकराच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली असून तरुणाला उडी मारणे जिवावर बेतले आहे.

नाशिकच्या म्हसरूळ परिसरात कमलनगर परिसरात ही घटना घडली आहे. प्रियकर हा नाशिकच्या हिरावाडी परिसरातील असल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणात प्रियकर किंवा प्रेयसी काय करतील याचा काही नेम नसतो. प्रियकर हा प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. भेटीनंतर प्रियकर घराच्या बाहेर जाणार त्याच वेळी प्रेयसीचा पती आला. पतीने चौकशी करण्यास सुरुवात केल्याने प्रियकर घाबरला. त्याने पतीला धक्का देऊन घराच्या बाहेर पळ काढला. त्याचवेळी त्याने तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीत जीव वाचण्यासाठी उडी मारली. मात्र, ही उडी त्याची अखेरची उडी ठरली आहे. प्रियकर हा उडी मारल्यानंतर गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

नाशिकच्या म्हसरूळ येथील प्रेयसी आणि हिरावाडी येथील प्रियकर यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा असून प्रियकराचा मृत्यू झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

म्हसरूळ येथील विवाहित महिला आणि हिरावाडी येथील तरुणाची मैत्री झाली होती, त्यानंतर मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले होते.

म्हसरूळ येथे राहणाऱ्या प्रेयसीने पती घरी नाही म्हणून प्रियकराला बोलावले होते. त्याच दरम्यान प्रेयसीचा पती घरी आला होता.

पत्नी आणि प्रियकराची घटना पतीच्या लक्षात आल्याने त्याने प्रियकराची विचारपूस सुरू केली होती, मात्र त्याचवेळी प्रियकराणे धूम ठोकली आणि थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आहे.

Post a Comment

0 Comments