छोटे-छोटे वाद कधी हाणामारीपर्यंत पोहोचतील सांगू शकत नाही. असाच एका धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
ज्यात दोन गाडीचालकांमध्ये छोट्याशा कारणावरून वाद झाला. हा वाद इतका पेटला एका गाडीचालकाने त्याच्या रस्त्यात आडव्या आलेल्या सर्वांना आपल्या गाडीखाली चिरडलं आहे. दिल्लीतील हे धक्कादायक प्रकरण आहे. दिल्लीच्या अलिपूरमधील हे प्रकरण.
बाईकचालक आणि कारड्रायव्हरमध्ये वाद झाला. यानंतर कारचालका बाईकस्वारासह त्याची बाजू घेत या भांडणात पडलेल्या लोकांच्या जीवावर उठला. त्याने त्याच्या गाडीसमोर रस्त्यात असलेल्या सर्वांवरून भरधाव गाडी नेली. ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
0 Comments