पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून केल्याप्रकरणी पतीला अटक


 याबाबत ऋषिकेश थिटे, वय 23 वर्षे, रा. थेरगाव, मुळ रा. बोदेगावात, परळी, जिल्हा बीड यांनी फिर्याद चाकण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी सतिष जाधव, मूळ गाव मेराळ सांगवी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी, सध्या रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे या आरोपीस अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात भा.द.वि कलम 302 अन्वये चाकण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे दाजी आरोपी थिटे याने फिर्यादी यांची बहिण महिना जाधव वय, 35 वर्षे हीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच तिला दोन्ही अपत्य मतिमंद झाल्याच्या कारणावरून तिला हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून तिचा खून केला आहे.

Post a Comment

0 Comments