साखर झोप सुरू असताना अंथरुणात साप शिरला, तीन ठिकाणी रुग्णालयात नेले पण...

 


साप दिसताच भल्या-भल्यांना पळता भुई कमी पडते अशी ग्रामीण भागात एक वाक्यप्रचार बोलला जातो. त्याचे कारण म्हणजे साप जर दिसला तर म्हणून जिवाच्या आकांताने त्यापासून दूर पळत असतो.

मात्र, नाशिकमध्ये एका व्यक्तीच्या अंथरूणातच साप शिरल्याची बाब समोर आली आहे. पहाटेच्या वेळी साखर झोपेत असतांना अंथरूणात सापाने प्रवेश करत दंश केल्याची घटना नाशिकरोड परिसरात असलेल्या विहितगाव येथे घडली आहे. यामध्ये 63 वयाच्या बबन गोविंदराव हांडोरे या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटणेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून वृद्धाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकच्या नाशिकरोड परिसरातील विहितगाव येथे पहाटे साखर झोपेत असलेल्या 63 वयाच्या बबन हांडोरे यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

हांडोरे हे घरात झोपलेले असतांना पहाटे त्यांच्या अंथरूणात साप शिरला होता, त्यावेळी त्याने हांडोरे यांना चावा घेतला होता.

हांडोरे यांना चावा घेतल्याचे लक्षात येताच त्यांना तात्काळ नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

तेथील डॉक्टरांनी तपासनी करताच परिस्थिति गंभीर होत चालल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

तेथी हांडोरे यांची परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालल्याने त्यांना थेट संदर्भ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

मात्र, तिथे उपचार सुरू असतांनाच हांडोरे यांची तब्येत अतिशय खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले.

यानंतर हांडोरे यांच्या मृत्यूनंतर नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हांडोरे यांच्या मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात असून सर्पदंश झाल्याने तात्काळ उपचार झाले असते तर हांडोरे यांचा जीव वाचला असता अशीही चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments