लग्नाबाबत आपण अनेकदा वडिलधाऱ्यांकडून ऐकले असेल की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पृथ्वीवर भेट हे निमित्त असतं. तसंच ज्याच्याशी तुमचं लग्न झालंय त्याच्याशी तुमचं नातं हे फक्त या जन्मासाठीच नाही तर पुढच्या सात जन्मांसाठीही बांधलं जातं, असंही मानलं जातं.
परंतु, अनेकवेळा असे घडते की वैवाहिक जीवनात इतके मतभेद आणि कटुता निर्माण होते की, या जन्मातही नाते टिकत नाही. म्हणून ज्योतिषशास्त्र नेहमी आयुष्याच्या जोडीदारासाठी राशिचक्र जुळण्यावर भर देते. मग ते प्रेमविवाह असो की अरेंज्ड मॅरेज. जर तुम्ही शत्रू किंवा विरुद्ध राशीच्या व्यक्तीशी लग्न केले तर तुमचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, सतत वादविवाद होत राहतात.
आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोक एकमेकांचे परफेक्ट पार्टनर बनू शकतात आणि कोणाशी संबंध बिघडू शकतात. लग्नासाठी तुम्हाला कोणत्या राशीचा जोडीदार योग्य? मेष- तूळ राशीचे जोडीदार हे मेष राशीच्या लोकांसाठी सर्वात परिपूर्ण असतात. वृश्चिक - या राशीसाठी वृषभ राशी सर्वात भाग्यवान मानली जाते.
मिथुन- मिथुन राशीच्या लोकांनी वृषभ, तूळ आणि सिंह राशीचा जोडीदार निवडावा. कर्क- ज्योतिषशास्त्रानुसार सिंह, मेष आणि धनु राशीचे जोडीदार या राशीसाठी उत्तम आहेत. सिंह- सिंह राशीच्या लोकांना कर्क, मेष, वृश्चिक, धनु आणि मीन राशीचा जोडीदार मिळाला तर त्यांचे वैवाहिक जीवन शांततापूर्ण असते. कन्या - कन्या राशीसाठी वृषभ जोडीदार उत्तम आहे.
दोन राशींमध्ये खूप सामंजस्य आहे. तूळ- मेष, मिथुन, कन्या आणि मकर राशीचे जोडीदार या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान आहेत. वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन वृषभ, धनु आणि मीन राशीच्या जोडीदारासोबत यशस्वी होते. धनु - सिंह आणि मेष राशीचे जोडीदार धनु राशीसाठी चांगले आहेत.
0 Comments