दारूविक्रेत्याचा पोलिस पाटलावर जीवघेणा हल्ला

 


दारुविक्री न करण्यासाठी समजूत घालण्यास गेलेल्या पोलीस  पाटलावर चाकूचे वार करुन दारुविक्रेत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना धामणगाव वाठोडा गावात घडली.

याप्रकरणी रात्री उशिरा सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कमलाकर नेहारे (४७) असे जखमी पोलीस पाटलाचे नाव आहे. 

तर अल्ताफ शेख असे हल्ला करणाऱ्या दारुविक्रेत्याचे नाव आहे.चाकूहल्ला करणाऱ्या दारुविक्रेत्याला गावकऱ्यांनी चोप दिल्याने त्याला सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षन निलेश ब्राह्मणे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments