धावत्या दुचाकीवर तरुणीचा विनयभंग



 वी मुंबई - शीव-पनवेल महामार्गावर बेलापूर  जवळ धावत्या दुचाकीवर तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर जेवण करून रात्री उशिरा फेरफटका मारण्यासाठी गेली होती. यावेळी तीन मैत्रिणी मिळून एका दुचाकीवर बेलापूर ते खारघर फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या

तेव्हा अनोळखी दुचाकीस्वारांनी एका तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित तरुणीने सिबिडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सिसिटीव्हीच्या माध्यमातून अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे.


Post a Comment

0 Comments