शेवटच्या २ सेकंदात आयुष्याचं सगळं सार आहे


खाद्या व्यक्तीसोबत सात फेरे मारत लग्न केल्यानंतर आयुष्यभर साथ देणे हे हिंदू संस्कृतीत महत्त्वाचे असते. तर एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होऊन एकमेकांना साथ देणे म्हणजे खरे आयुष्य.

सध्या एका दाम्पत्याचा विवाह होत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शेवटच्या दोन सेकंदात आयुष्याचे खरे सार आहे अशी टॅगलाईन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

लग्नाच्या रिसेप्शनच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ असून मुलीला एक महिला भेटायला आलेली आहे. तिला पाहून नवऱ्या मुलीला रडू कोसळले असून नवरा मुलगा तिच्याकडे पाहून अस्वस्थ झाला आहे. तर आपल्या बायकोचे रडू थांबवण्यासाठी तो काहीच करू शकत नाही. त्यानंतर तो रडायला सुरूवात करतो. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली आहे.

Post a Comment

0 Comments