समंथा प्रभूच्या मानधनात पुन्हा वाढ झाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील सुंदर अभिनेत्री समंथा प्रभू सध्या 'शाकुंतलम' आणि 'यशोदा' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.
यासोबतच समंथाच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबद्दलही बरीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत आता समंथाने पुन्हा एकदा फी वाढवल्याचे कळते आहे. 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंटावा' या आयटम साँगच्या लोकप्रियतेनंतर ती एक पॅन इंडिया स्टार बनली आहे. 'द फॅमिली मॅन' वेबसीरिज आणि 'जानू' चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
0 Comments