शहरात सोनसाखळी चोर मोकाट


नाशिक : खुडवटनगर परिसरात रात्री शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्याचे हिसकावून नेल्याची घटना घडली.

गेल्या १६ दिवसातील जबरी चोरीची ही १३ वी घटना आहे. तर, यामध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याच्या १० घटना घडल्या आहेत.

ऐन सणासुदीमध्ये महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्या जात असताना, त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदीचा केलेला दावा मात्र फोल ठरतो आहे. या वाढत्या घटनांमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात तर आलेली असतानाच पोलिसांविषयी रोषही वाढला आहे

Post a Comment

0 Comments