प्रियकराचा प्रताप! प्रेयसीच्याच घरी मारला १४ लाखांचा डल्ला

 


ब्रेकअप झाल्याचा राग मनात धरून एका प्रियकराने प्रेयसीच्याच घरात चोरी केल्याचा प्रकार पुण्यातून  उघडकीस आलाय.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकरास ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून त्याच्याकडून २८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आलाय.

सतीश परदेशी असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील आंबेगाव येथील लक्ष्मी गार्डन सोसायटी भागात २ ऑक्टोबर रोजी घरफोडीची घटना घडली होती. याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस चोरट्याचा शोध घेत होते.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर संशयित व्यक्ती दिसून आली. परिसरातील इतर सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली.

Post a Comment

0 Comments