गिझरच स्फोट होऊन नवविवाहित डॉक्टरजोडप्याचा दुर्दैवी मृत्यू

 


हैदराबाद - गुरुवारी रात्री उशिरा हैदराबादमधील लंगर हौज येथील खादरबागमधील एका घरात शॉर्टसर्किटमुळे गीझरचा स्फोट झाला. या भीषण अपघातात नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे.रात्री ९.३० वाजता पोलिसांना या प्रकरणाची माहिती स्थानिकांकडून मिळाली.

घटनेची माहिती मिळताच पाच मिनिटांत नाईट ड्युटी ऑफिसर एस श्रुती, पोलिस निरीक्षक के श्रीनिवास आणि अतिरिक्त पोलिस निरीक्षक मुजीब उर रहमानी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना घराच्या बाथरूममध्ये पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. २६ वर्षीय डॉक्टर निसारुद्दीन आणि २२ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थी आणि निसरुद्दीनची पत्नी उम्मी मोहिमीन सायमा यांचा जागीच मृत्यू झाला होता. नाईट ड्युटी ऑफिसरने तात्काळ मृत व्यक्तींचे मृतदेह तपासणीच्या उद्देशाने शवागारात जतन करण्यासाठी उस्मानिया सामान्य रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली.

Post a Comment

0 Comments