घरातील सोन्याच्या ऐवजावर मोलकरणीचा डल्ला

 


कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक भागात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरातील सोन्याचा एक लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज याच घरात गृहसेविका म्हणून काम करणाऱ्या महिलेने लांबविला असल्याचा संशय व्यक्त करुन, कुटुंबीयांनी गृहसेविके विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला.

हेमलता राजेश डोळस (रा. दत्त काॅलनी, कोळसेवाडी, कल्याण पूर्व) असे गुन्ह्यातील संशयीत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, रोमा सूर्यवंशी या खासगी नोकरी करतात. त्या कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकातील पोटे सोसायटीत राहतात. सासू, पती, मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. रोमा, त्यांचे पती नियमित कामाला जातात. मुलगा शाळेत जातो. वृध्द सासू घरात असते. रोमा यांच्या घरात हेमलता या मोलकरीण म्हणून काम करतात. गेल्या पंधरा दिवसापूर्वी रोमा यांनी घरातील कपाटात ठेवलेली दागिन्यांची पेटी पाहिली. त्यात एक लाख ७६ हजार रुपयांचा सोन्याचा इतर किमती ऐवज नव्हता. चोरी लक्षात येऊ नये म्हणून सोन्याचा शिक्का, चांदीचे दागिने पेटीत ठेऊन देण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments