41 लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना कांदिवली येथे घडली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा नोंद केला. नोकराच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.
कांदिवलीत राहणाऱया तक्रारदाराच्या घरी तो नोकर गेल्या 12 वर्षांपासून काम करायचा. तो तक्रारदाराच्या कार्यालयातही ये-जा करायचा. दीड वर्षापूर्वी तक्रारदार यांच्या घराच्या आणि लॉकरच्या चाव्या गहाळ झाल्या होत्या. त्यामुळे त्याने नोकराला बनावट चावी बनवण्यास सांगितले होते. तीन दिवसांपूर्वी त्याने नोकराला पह्न करून फटाक्यांची डिलिव्हरी घेण्यास सांगितले. नोकराने आपण बिहारला आल्याचे त्यांना सांगितले. त्या नोकराला सुट्टीबाबत तक्रारदार यांनी कार्यालयात विचारणा केली तेव्हा त्याला कोणीच सुट्टी दिली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटला. लक्ष्मीपूजनासाठी दागिने हवे असल्याने त्याने लॉकरची तपासणी केली तेव्हा त्यात दागिने नव्हते. याप्रकरणी त्यांनी पोलीसांत तक्रार केली.
0 Comments