भरधाव बसची कंटेनरला धडक, ४० प्रवासी जखमी



ळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना भुसावळ रोडवर घडली. यात ४० प्रवासी जखमी झाले असून, यात काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना उतरवून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.

याबाबत सविस्तर असे की, जळगाव येथून भुसावळकडे निघालेली बस (एम.एच. २०, बीएल.०९४७) ला मार्गातच रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. महामार्गावर कंटेनरच्या पाठोपाठ जाणाऱ्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बसने अचानक कंटेनरला धडक दिली. या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. यातील ४० जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अपघात कसा घडला याची नेमकी माहिती मिळाली नसून, पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. जळगाव बसस्थानकातून भुसावळसाठी रवाना झालेल्या बसमध्ये जवळपास ४० ते ४५ प्रवासी होते. यात काही नशिराबाद येथील विद्यार्थी होते. अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना बसमधून उतरवून जिल्हा रुग्णालयात आणले. यातील किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले. तर दोन प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांचे सिटीस्कॅन करण्यात येणार आहे

Post a Comment

0 Comments