फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात तरुणाची हत्या

 



दिवाळीचा सण सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला, कोरोनाच्या नंतर दोन वर्षांनी यंदा सर्व सण कोरोना निर्बंध साजरे केले जात आहे. यंदा लोकांमध्ये उत्साह दाणगा आहे. काही ठिकाणी या सणाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या आहे. मुलांमध्ये दिवाळीला आतषबाजी करण्यासाठी जल्लोष वेगळाच असतो. मुलं फटाके फोडतात. फटाके फोडताना अपघात देखील होतात. या मुळे फटाके चालवताना काळजी घेण्यास सांगितले जाते. गोवंडीत फटाक्यांच्या वादावरून तीन अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षाच्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात नटवर पारेख कंपाउंड येथे घडली. सुनील नायडू(21) असे या मयत तरुणाचे नाव आहे. तर त्यांच्यावर मारहाण करणारे मुलं 12 ते 15 वयोगटातील आहे.

दिवाळीत काही अल्पवयीन मुलं सोमवारी दुपारी नटवर पारेख कंपाउंड मध्ये बाटलीतून फटाके फोडत असताना सुनील यांनी मुलांना फटाके बाटलीतून फोडण्यास रोखले. या वर तिन्ही अल्पवयीन मुलांनी सुनील यांच्याशी वाद घातला आणि त्यांना जबर मारहाण करत चाकूने सपासप वार करायला सुरु केले. या हल्ल्यामुळे सुनील हे गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतातच त्या अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तिसरा मुलगा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments