कुणी सांगेल का हे चिंपांझी एकमेकांना मिठी का मारतायत? हे इतके खुश का आहेत? त्यांना झप्पीचं महत्त्व कळलंय का? वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.
जेव्हा खूप दिवसांनी मित्र एकमेकांना भेटतात तेव्हा ते आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. पण असं आपण कधी प्राण्यांना करताना पाहिले आहे का?
असाच काहीसा प्रकार सध्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिंपांझी आपल्या साथीदारांच्या दिशेने वेगाने जातोय आणि त्यांना एकामागून एक मिठी मारत आहे.
जसे की ते खूप दिवसांनी एकमेकांना भेटत आहेत असं वाटतंय कारण ते आपुलकीने आणि उत्सुकतेने भेटतायत. ते ज्या पद्धतीने भेटतायत ते पाहून तुम्हाला कळेल की माकडांना आपलं पूर्वज का म्हटलं जातं.
बरं, चिंपांझींचा हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे.
41 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 24 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने गंमतीने लिहिले की, ही माजी विद्यार्थ्यांची भेट असू शकते, तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, 'असे दिसते आहे की हे प्राणी कोणतीही चिंता आणि तणावाशिवाय आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहेत'.
0 Comments