भर रस्त्यात महिलेला भोसकले

 


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर महिलेला चाकू भोसकून खून करताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे सीसीटीव्ही फुटेज मुंबईच्या रस्त्यावरील असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

रस्त्याने चाललेल्या महिलेच्या पाठीमागून येऊन एक व्यक्ती हत्याराने त्या महिलेला जीवे मारत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.विशेष म्हणजे या मारेकऱ्याने आपली ओळख लपवली आहे. यासाठी त्याने काळी हॅट घातली आहे. तसेच महिलेचा खून केल्यानंतर ही व्यक्ती मृतदेह रस्त्याच्या बाजूला ओढत नेताना देखील दिसते. या सीसीटीव्ही वरून ही घटना अंधेरीमधील असलयाचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments