आकाश नारायण जाधव (वय 20, रा. दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी मुलीचा जाता येता पाठलाग केला. आरोपीने मुलीकडे प्रेमाची मागणी केली. ती जर नाही म्हणाली तर त्याने स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली. वारंवार त्याने पाठलाग करून अशा प्रकारची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments