चालत्या वाहनाने अचानक पेट घेतल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. अनेकदा यात लोकांना जीवही गमवावा लागतो. तर, अनेकदा लोक सुदैवाने अशा भीषण घटनांमधून वाचतात
गोंदिया शहरातून आता अशीच एक घटना समोर आली आहे. यात परमात्मा नगर इथून दुचाकीने पती-पत्नी जात असताना अचानक गाडीला आग लागली. आग इतकी तीव्र होती की थोड्यावेळातच आगीने रौद्र रूप घेतले.
बाब लक्षात येताच दुचाकी चालकाने पत्नीला गाडीवरुन खाली उतरवून गाडी बाजूला फेकली.
दुचाकीस्वाराच्या सतर्कतेमुळे या घटनेत पती पत्नी थोडक्यात बचावले. विशेष बाब म्हणजे 10 दिवसाआधीच शोरूममधून ही गाडी घेतली होती. मात्र, या गाडीने अचानक पेट घेतला. गोंदिया येथे खापरडे कॉलोनी इथे राहणार दीपक साखरे (वय २८ वर्ष) हा आपल्या पत्नीबरोबर रामनगर येथे दुचाकीने जात होता.
यावेळी परमात्मा नगर इथे चालत्या गाडीला अचानक आग लागल्याचं दिसताच त्याने पत्नीला गाडीवरून उतरवत गाडी रस्त्याच्या कडेला फेकली. यानंतर तो आग विझविण्याचा प्रयत्न करू लागला
0 Comments